नागरिकांच्या बेदम मारहाणीत दोन चोरांचा मृत्यू

March 15, 2011 12:36 PM0 commentsViews: 3

15 मार्च

ठाण्याच्या खारेगाव परिसरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या दोन भुरट्या चोरांना नागरिकांनी बेदम मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खारेगाव परिसरात आज पहाटे सलमान खान आणि इमरान खान हे दोघे चोरीच्या उद्देशाने घुसले मोटारसायकलची चोरी करत असताना नागरिकानी त्यांना पकडलं त्यानंतर नागरिकांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर त्यांना कळव्याच्या शिवाजी रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं. या प्रकरणाचा पुढील तपास कळवा पोलीस करत आहेत.

close