मुलांसह आत्महत्या करण्यार्‍या महिलेच्या पतीला अटक

March 15, 2011 12:49 PM0 commentsViews: 7

15 मार्च

मालाडमध्ये महिला दिनाच्या दिवशी निधी गुप्ता या महिलेने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली होती. पोलिसांनी आता या प्रकरणी निधीच्या नवर्‍याला अटक केलीय. आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं आणि हुंड्यासाठी छळ करण्याचे आरोप निधीच्या नवर्‍यावर दाखल करण्यात आले आहेत. या आधी पोलिसांनी निधीच्या नणंदेलाही अटक केली.

close