सोमदेवची लढत आता राफेल नदालशी

March 15, 2011 12:59 PM0 commentsViews: 1

15 मार्च

वर्ल्ड कपची धूम सर्वत्र सुरु असतानाच इतर खेळांतही भारतीय खेळाडूंनी आपली विजयी घोडदौड सुरु ठेवली. इंडियाना वेल्स टेनिस स्पर्धेत भारताच्या अव्वल सीडेड सोमदेव देवबर्मननं चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. आणि आता त्याची गाठ पडणार आहे ती वर्ल्ड नंबर वन राफेल नदालशी. तिसर्‍या फेरीत सोमदेवनं बेल्जियमच्या झॅव्हिअर मॅलिसचा 6-1, 3-6, 7-6 नं पराभव केला. तिसर्‍या आणि निर्णायक सेटमध्ये सोमदेव 2-5 नं पिछाडीवर होता पण त्यानंतर त्यानं जोरदार कमबॅक केला आणि मॅच आपल्या खिशात घातली.

close