गोव्यात पर्यटक घेताहेत स्वत:च्या सुरक्षेची काळजी

November 7, 2008 2:15 PM0 commentsViews: 27

7 नोव्हेंबर, पणजीतुलसीदास चारी स्कारलेट बलात्कार आणि खून प्रकरण, त्यानंतर हाय प्रोफाईल राजकारण्याच्या मुलाकडून करण्यात आलेला अल्पवयीन जर्मन मुलीवर बलात्कार या दोन प्रकरणांमुळे गोव्याच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. पण या घटनेनंतरीही पर्यटकांना गोवा अजून सुरक्षित वाटतं आहे. पर्यटकच धोकादायक ठिकणी जाणं टाळत आहेत. बीचवरती रात्री उशीरापर्यंत भटकंती करणंही पर्यटकांनी टाळलं आहे. दहशतवादाची पाळेमुळे दिवसेंदिवस घट्ट होत आहेत. त्यामुळे देशातलं कुठलंच ठिकाण सुरक्षित राहिलं नसल्याचं काही पर्यटकांचं मत आहे. गोव्याला ग्रुपनेच जाणं पर्यटकांनी पसंत केलं आहे. पर्यटक गोव्यात येत असले तरी, गोव्याची प्रतिमा खालावत असल्याचं स्थानिक राजकारण्यांचं म्हणणं आहे. ''एखादी वाईट घटना गोव्यात घडणं आणि नंतर त्या घटनेचा प्रींट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातून उदोउदो होणं ही गोष्ट गोव्याच्या दृष्टीने नक्कीच चांगली नाही,'' असं मत गोव्याचे भाजपचे आमदार दामोदर नाईक यांनी व्यक्त केलं आहे. गोवा हे पर्यटकांचं नंदनवन आहे. पण, देशात होत असलेले हल्ले लक्षात घेता ते दहशतवाद्यांच्या रडावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अधिक सावधगिरीची गरज आहे.