मुंबईत पाच उपोषणकर्ते हॉस्पिटलमध्ये दाखल

March 15, 2011 4:08 PM0 commentsViews: 3

15 मार्च

मुंबईत आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या पाच उपोषणकर्त्यांना आज हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. आदिवासी आयटीआयच्या राज्यभरातील कर्मचार्‍यांनी हे 10 मार्चपासून उपोषण सुरू केलंय. सुमारे 200 तरूण इथे उपोषण करत आहे. सध्या या आयटीआय सेंटर्सना दरवर्षी मुदतवाढ देण्यात येते. त्याऐवजी हे आदिवासी आयटीआय कायमस्वरूपी करावेत आणि कर्मचार्‍यांनाही कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी यांची मागणी आहे. त्यासाठी हे कर्मचारी आझाद मैदानात उपोषण करायला बसले असताना त्यांच्या पाच कर्मचार्‍यांना चक्कर आली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

close