प्रभाकर पणशीकरांच्या आठवणींना उजाळा

March 15, 2011 8:07 AM0 commentsViews: 1

15 मार्च

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर यांच्या 81 व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने 'तो मी नव्हेच' या नाटकाचा अप्रकाशित व्हिडिओ नुकताच प्रेक्षकांना दाखवण्यात आला. मुंबईतल्या यशवंत नाट्यमंदिरात हा कार्यक्रम झाला. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे आणि फैय्याज यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला अखिल भारतीय नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, आणि पणशीकर कुटुंबीय हजर होते. पणशीकर यांच्यावरचा हा अप्रकाशित व्हिडिओ पाहण्यासाठी प्रेक्षकांनीही गर्दी केली होती.

close