दक्षिण आफ्रिकेची क्वार्टर फायनलमध्ये धडक

March 15, 2011 5:11 PM0 commentsViews: 1

15 मार्च

दक्षिण आफ्रिकेने आयर्लंडचा 131 रन्सने पराभव केला. या विजयाबरोबरच ग्रुप बी मध्ये आफ्रिकेने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आणि क्वार्टर फायनलमध्ये आपलं स्थानही पक्क केलंय. आफ्रिकेने आयर्लंडसमोर 273 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. पण त्यांची टीम 141 रन्समध्ये ऑल आऊट झाली. त्याआधी आयर्लंडच्या बॉलर्सनीही आफ्रिकने बॅट्समनला चांगलाच दणका दिला होता. त्यांची निम्मी टीम 120 रन्सच्या आतच पॅव्हेलियनमध्ये परतली होती. पण जे.पी. ड्युमिनीने इंग्राम आणि बोथाच्या साथीने आफ्रिकेचा स्कोअर 272 रन्सवर नेऊन ठेवला. ड्युमिनीची सेंच्युरी अवघ्या एका रन्सने हुकली.

close