जपानमध्ये साडेचार लाख लोक बेघर

March 15, 2011 5:21 PM0 commentsViews: 12

15 मार्च

जपानमध्ये आलेल्या प्रलंयकारी सुनामीनंतर तेथील बचावकार्य सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार तिथला मृतांचा आकडा 3 हजार 300 वर पोहचला आहे. तर 6 हजार 700 लोक अजूनही बेपत्ता आहेत. तरी आत्तापर्यंत 15 हजार लोकांना वाचवण्यात जपानी बचाव पथकांना यश आलंय. पण तब्बल साडेचार लाख लोक बेघर झाले आहेत. त्यांची सध्या तात्पुरत्या निवार्‍यात राहण्याची सोय करण्यात आली आहेत. जगभरातल्या 91 देशांनी जपानला आपत्कालीन मदत देऊ केलीय. तर वेगवेगळ्या देशातील अणुशास्त्रज्ञही जपानमध्ये दाखल झाल्याचं जपानी सरकारच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

इन्फोसिसनं आपल्या कर्मचार्‍यांना परत बोलावलेजपानमध्ये आलेल्या आपत्तीमुळे इन्फोसिसनंआपल्या कर्मचार्‍यांना तिथून परत बोलवलंय. असं करणारी इन्फोसिस ही पहिलीच भारतीय कंपनी आहे. गरज पडली तर एका खास विमानाने त्यांच्या कर्मचार्‍यांना सुखरूप घरी आणण्यात येईल असा दिलासाही कंपनीनं दिला. जपानमध्ये इन्फोसिसचे पाचशे कर्मचारी आहेत त्यापैकी साडेतीनशे कर्मचारी भारतीय आहेत. प्रत्यक्षात जपानमधून इन्फोसिसला अत्यल्प उत्पन्न मिळतं. त्यामुळे तिथल्या कर्मचार्‍यांना परत बोलावल्याने कंपनीवर फारसा परिणाम होणार नाही असंही कंपनीनं सांगितले आहे. आता यापुढे टीसीएस, विप्रो कंपनीनहीं त्यांच्या कर्मचार्‍यांना परत बोलावण्याचे संकेत दिले आहे. दरम्यान जपानच्या शेअर बाजारात आज मोठी पडझड झाली. त्यानंतर आशियातील सगळी प्रमुख मार्केटसही दणादण कोसळली.

शेअर बाजार कोसळला

- जपानच्या शेअर बाजारात 287 बिलियन डॉलर्सची पडझड- जपानचा निकेई, हंगसंग, कोस्पी, शंघाई बाजारही गडगडले- आशियातील सर्व प्रमुख शेअर बाजार कोसळले- भारतीय शेअर बाजारात सुरुवातीला 400 नं गडगडला- भारतीय शेअर नंतर सावरला तो 18 हजार 167 वर बंद झाला, त्यावेळी इंडेक्स 271 नं कोसळला होता- निफ्टी 81 अंशांनी कोसळला, निफ्टी स्थिरावला 5 हजार 449 वर

close