फाटक यांच्यावर गुन्हा दाखल

March 16, 2011 9:05 AM0 commentsViews: 2

16 मार्च

आदर्श घोटाळ्या प्रकरणी जयराज फाटक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयराज फाटक आदर्श प्रकरणातले चौदावे आरोपी आहेत. जयराज फाटक मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त होते. या पूर्वी या घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणी त्याच प्रमाणे लष्करातील माजी अधिकारी यांचा समावेश आहे. या प्रकरणात आता केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर जयराज फाटक यांचा आरोपींमध्ये समावेश करण्यात आला. फाटक यांना आरोपी करण्यापूर्वी सबंधीत म्हणजेच दिल्ली पोलिसांची डिईपीएस म्हणजेच दिल्ली पोलीस इशटँबलीशमेंट ऍक्टनुसार परवानगी घेणं आवश्यक होतं. तशी परवानगी सीबीआयच्या अधिकार्‍यांनी दिल्ली पोलिसांकडे मागितली होती. ती परवनगी त्यांना मिळाली. यानंतर लगेचच फाटक यांच्यावरील कारवाई सुरु झाली.

हा गुन्हा 29 जानेवारी 2011 रोजी नोंदवण्यात आला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा तसेच भा.द.वी 120-बी , 420 , 468 आणि 471 या नुसार म्हणजेच कट रचने, फसवणूक करणे, फसवणुकीसाठी खोटे कागदपत्र तयार करणे आणि खोटे कागदपत्र खरे म्हणून वापरणे त्याचप्रमाणे सरकारी पदाचा गैरवापर करणे अशा प्रकारची कलम लावण्यात आली आहेत.आता ही सारी कलमं जयराज फाटक यांनाही लागू आहेत.

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात आता पर्यंत तेरा आरोपी होते.आता चौदाव्या आरोपीची नोंद झली आहे. हा चौदावा आरोपी आहे. मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त जयराज फाटक. आदर्श घोटाळा प्रकरणाचा गुन्हा नोंदवला तेव्हा फाटक हे केंद्र सरकारच्या सेवेत होते. दिल्ली येथे ते नियुक्त होते. यामुळे त्यांना आरोपी करण्यात आलं नव्हतं. त्यांचं नावं प्रस्ताविक आरोपी म्हणून नोंदवण्यात आलं होतं.आदर्श प्रकरणातील आरोपी

1)आर.सी.ठाकूर – एसडिओ, संरक्षण विभाग2) मदन मोहन वाच्छू – निवृत्त ब्रिगेडियर 3) कन्हैयालाल गिडवाणी – माजी आमदार 4) ए.आर.कुमार – निवृत्त ब्रिगेडियर 5) रोमेशचंद्र शर्मा – निवृत्त ब्रिगेडियर 6) तेज कृष्णा कौल – मेजर जनरल, निवृत्त 7) टि.के.सिन्हा – निवृत्त ब्रिगेडियर 8) पी.के.रामपाल – ब्रिगेडियर 9) पी.व्ही.देशमुख – उपसचिव, नगर विकास विभाग 10) रामानंद तिवारी – प्रधाव सचिव, नगर विकास विभाग 11) सुभाष लाला – प्रधान सचिव मुख्यमंत्री कार्यालय 12) डॉ.प्रदीप व्यास – जिल्हाधिकारी, मुंबई .13) अशोक चव्हाण – माजी मुख्यमंत्री

close