शीला किणी यांचं निधन

March 16, 2011 10:06 AM0 commentsViews: 70

16 मार्च

रमेश किणी यांच्या पत्नी शीला किणी यांचं आज माटुंग्याच्या राहत्या घरी निधन झालं. रमेश किणी यांच्या रहस्यमय मृत्युबद्दल शीला किणी यांनी 1990 च्या दशकात दिलेल्या लढ्याने त्यावेळच्या राजकारणात खळबळ माजवली होती. 1996 मध्ये पुण्यातल्या एका थिएटरमध्ये रमेश किणी यांचा मृतदेह सापडला होता. रमेश किणी यांच्या मृत्यूला त्यावेळेस शिवसेनेत असलेले राज ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप शीला किणी यांनी केला होता. राज ठाकरे यांची याबाबत चौकशीही झाली होती. त्यानंतर आपल्याला न्याय मिळावा या मागणीसाठी शीला किणी यांनी धैर्यानं लढा दिला होता.सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे याही शीला किणी यांच्यासोबत या लढ्यामध्ये सहभागी होत्या.

close