मुंबईत रस्त्यावरील मंदिर – मशीद तोडल्याप्रकरणी खुलासा मागवला

March 16, 2011 10:45 AM0 commentsViews: 1

16 मार्च

मुंबईतील रस्त्यावरील मंदिर – मशीद ही धार्मिक स्थळ तोडली जात होती. यामागे सुप्रीम कोर्टाचे काही निकाल असेल तर त्याचा नेमका अर्थ काय ? या प्रकारात चुकीचे अर्थ लावले गेलेत काय ? याचा खुलासा त्या अधिकार्‍यांकडून मागवून घ्यावा असे निर्देश विधानसभा अध्यक्षांंनी दिलेत. मुंबईचे कमिशनर सुबोधकुमार यांच्याकडून हा खुलासा मागवण्यात येणार आहे. या प्रकरणात सरकारची भूमिका काय याबाबत दोन दिवसात निवेदन करा. तसेच लोकप्रतिनिधींच्या सूचना डावलणार्‍या अधिकार्‍यांना योग्य त्या सूचना द्या असंही अध्यक्षांनी म्हंटलंय. बाबा सिद्दीकी यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे हा मुद्दा मांडला होता. दरम्यान येत्या दोन दिवसात निवेदन करु असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिलंय.

close