मोनिका हत्याप्रकरणी मारेकरी मोकाट

March 16, 2011 10:52 AM0 commentsViews: 36

16 मार्च

नागपूरमध्ये 5 दिवसांपूर्वी केडीके कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला शिकणार्‍या मोनिका किरणापुरे या विद्यार्थीनीचा भरदिवसा खून करण्यात आला. या घटनेला पाच दिवस उलटून गेले असले तरी पोलिसांना मोनिकाच्या मारेकर्‍यांना पकडण्यात यश आलं नाही. 11 मार्चला मोनिका हॉस्टेलमधून कॉलेजला जात होती. त्यावेळी मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांनी चाकूचे वार करुन तिची हत्या केली होती. मात्र या घटनेला पाच दिवस उलटल्यानंतरही आरोपींना पकडण्यात पोलीस अपयशी ठरले आहे.

close