त्याने बनवला तेरा फूटाच्या पेन..

March 16, 2011 11:45 AM0 commentsViews: 5

16 मार्च

नागपूरच्या एका ध्येय वेड्यानं जगातीलं सगळ्यांत मोठं पेन बनवला आहे. या बॉल पेनची लांबी आहे. तेरा फूट तीन इंच.आणि त्याचं वजन आहे 29 किलो. नागपूरच्या अजित सिंग यांनी या पेनाची निर्मिती केली. हा पेन बनविण्यासाठी त्यांना चार महिने अथक परिश्रम घ्यावे लागले. भल्या मोठ्या आकाराचा हा पेन लिहिण्यात ही पटाईत आहे. एकदा सुरू केला तर आपण न थांबता याने दहा किलोमिटर पर्यंत लिहू शकतो.

या पेनला बनविण्यासाठी अजित सिंग यांनी स्टील, लाकुड,प्लास्टीक, पीवीसी या सारख्या साहित्याचा वापर केला आहे. माईंड आई एज्युकेशन संस्थेचे असलेले अजित सिंग यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. देशातील वेगवेगळ्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना याबाबत माहिती देण्याचं त्यांनी ठरवलं आहे. या पेनची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधे नोंद व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. विशेष म्हणजे भारताने वर्ल्ड कप जिंकला तर अशाच प्रकारचं दुसरं पेन बनवून सचिन तेंडूलकरला देण्याचंही त्यांनी ठरवलंय.

close