मसापच्या निवडणुकीत माधवी वैद्य यांचं पॅनल विजयी

March 16, 2011 11:48 AM0 commentsViews: 5

16 मार्च

पुण्यातल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीमध्ये माधवी वैद्य यांचं साहित्योपासक पॅनल विजयी झालं. ही निवडणूक चांगलीच चुरशीची ठरली. वि.भा. देशपांडे आणि माधवी वैद्य एकमेकांविरोधात निवडणुकीला उभे राहिले होते. त्यानंतर झालेल्या आरोप प्रत्यारोपामुळे या निवडणुकीला वेगळाच रंग प्राप्त झाला होता. मात्र काल झालेल्या निवडणुकीमध्ये कार्याध्यक्ष पदासाठी माधवी वैद्य या वि.भा देशपांडे यांना हरवून विजयी झाल्या. तर प्रमुख कार्यवाह पदी माधवी वैद्य यांच्या पॅनलचे मिलिंद जोशी निवडून आले.

close