केशवसुतांच्या कवितांचं वाचन विंदांनी केलं

November 7, 2008 3:26 PM0 commentsViews: 8

7 नोव्हेंबर, मुंबई मराठीतले आद्य कवी केशवसुत उर्फ कुष्णाजी केशव दामले यांचा आज स्मृतीदिन. गेल्या वर्षीपासून या दिवशी दामले कुटुंबीय आणि आशय सांस्कृतिक यांच्या वतीनं केशवसूत स्मृती पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार कवीवर्य विंदा करंदीकर यांना देण्यात आला. यावेळी विंदांनी भाषण केलं नाही. तर केशवसुतांच्या आणि स्वत:च्या काही कवितांचं वाचन केलं.

close