रेल्वेतून 129 धारदार शस्त्रे नेणार्‍या व्यक्तीला अटक

March 16, 2011 11:25 AM0 commentsViews: 2

16 मार्च

औरंगाबादच्या दहशतवादी विरोधी पथकाने रेल्वेतून अमृतसरला जाणार्‍या एका व्यक्तीला अटक करून त्याकडून एकशे एकोणीस धारदार शस्त्रे जप्त केली. आरोपी बलजितसिंग भगवानसिंग बावरी हा पूर्वी सीमा सुरक्षा दलात जवान होता. त्याच्याकडून सत्तर तलवारी, पन्नास कुकरी, चौतीस चॉपर, चोवीस खंजीर आणि एकोणीस चाकू जप्त करण्यात आले आहेत. आरोपीला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीने ही सर्व शस्त्रे नांदेडहून आणलेली आहे.

close