ऑलिम्पिकची तिकीट खिडकी उघडली

March 16, 2011 12:48 PM0 commentsViews: 1

16 मार्च

भारतात सध्या क्रिकेट वर्ल्ड कपची धूम सुरु आहे. पण पुढच्या वर्षी होणार्‍या लंडन ऑलिम्पिकचे पडघमही आता वाजू लागले आहेत. ऑलिम्पिकची ऑनलाईन तिकीट विक्री नुकतीच सुरु झाली आहे. वर्ल्ड कप प्रमाणेच ऑलिम्पिकची तिकीटंही बॅलट पद्धतीने मिळणार आहेत. ऑनलाईन बॅलट फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 26 एप्रिलपर्यंत आहे. ऑलिम्पिकच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हा बॅलट फॉर्म भरायचा आहे. एकूण 39 क्रीडा प्रकारातल्या 649 स्पर्धांची तिकीटं सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आणि स्पर्धेचं कमीत कमी तिकीट वीस पाऊंड्स इतकं आहे. तर जास्तीत जास्त किंमत आहे दोन हजार पाऊंड इतकी. शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीचं फायनलचं तिकीट आहे 725 पाऊंड्स आहे.

close