विठोबाच्या मंदिरात दक्षिणा बंदी

March 16, 2011 1:39 PM0 commentsViews: 6

16 मार्च

पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी गेल्यावर भक्तांना आधी सामना करावा लागतो तो बडव्यांचा. बडवे दक्षिणेसाठी तगादा लावत असल्यानं भक्त या प्रकारावर प्रचंड नाराज होते. त्याविरूध्द असंख्य तक्रारी ही मंदिर समितीकडे आल्या होत्या त्या सगळ्यांची दखल घेऊन आता बडवे आणि उत्पात समाजाने आता मंदिरात दक्षिणा न मागण्याचा निर्णय घेतला आहे. जर कुणी दक्षिणा मागितल्याचे आढळल्यास त्याला मंदिरात प्रवेशास बंदी घालण्यात येणार असल्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे भक्तांची बडव्यांच्या त्रासातून सुटका होणार आहे.

close