यशवंत सोनवणेंच्या संपत्तीची चौकशी करा – जयंत पाटील

March 16, 2011 2:57 PM0 commentsViews: 8

16 मार्च

यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणात दुसरी बाजुही तपासून पाहिली पाहिजे अशी मागणी करत शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी सोनवणेंच्या संपत्तीची चौकशी करा अशी मागणी केली. यशवंत सोनवणे हे हप्ता मागण्यासाठी गेले होते. त्यामुळे वैतागलेल्या पोपट शिंदेंनी स्व:तहाला जाळुन घेऊन सोनवणेंना मिठी मारली असा गंभीर आरोपही त्यांनी केला. भेसळ प्रकरणावर विधानसभेत चर्चेच्या वेळी जयंत पाटील यांनी हे आरोप केले.

close