नीरा राडिया यांची मुंबईत 750 कोटींची गुंतवणूक – रामदास कदम

March 16, 2011 5:45 PM0 commentsViews: 19

16 मार्च

मुंबईतल्या सांताक्रुझ पूर्व इथं एका भूखंडावर होत असलेल्या बांधकामामध्ये नीरा राडिया यांनी 750 कोटी गुंतविल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी विधान परिषदेत केला. सीटी सर्व्हे क्रमांक 13 हा भूखंड डिफेन्सच्या मालकीचा असून त्यावर गृहनिर्माण खात्यानं बांधकामाला परवानगी कशी दिली असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यावर हा भूखंड म्हाडाच्या मालकीचा असून त्यावर कोणतंही अनधिकृत बांधकाम केलं जात नसल्याचं गृहनिर्माण राज्यमंत्र्यांनी सांगितले आहे. आणि जर कदम यांनी आरोपाचे पुरावे दिले तर दोषींवर कारवाई करू असं आश्वासन राज्यमंत्र्यांनी दिलं आहे.

close