प्रियांकाच्या हस्ते कॅमेराचं लाँचींग

March 16, 2011 3:36 PM0 commentsViews: 3

16 मार्च

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानं नुकतच एका कॅमेराचं लाँचींग केलं. सतत कॅमेर्‍यासमोर फिरणार्‍या या चेहर्‍यांना जेव्हा त्यांच्या लेन्समागच्या आठवणींविषयी विचारलं तेव्हा प्रियांकाही कॅमेरा फ्रेंडली जाणवली. निकॉनच्या ब्रँडअम्बेसेडर प्रियांका चोप्राने नुकतचं एका कॅमेराचे लाँचींग केले. त्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या अभिनयाव्यतिरिक्त फोटोग्राफीसुद्धा करतेय. प्रियांकाचे सात खून बॉक्स ऑफिसवर माफ न झाल्यामुळे कदाचित ती आता नव्या प्रोफेशनचा विचार तर करत नाहीना. तर फोटोच्या आठवणी प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत असतात. हेच निमित्त साधत प्रियांकानंही अश्याचं काही आठवण यावेळी शेअर केल्या.

close