नागपूरमध्ये भाविसेच्या कार्यकर्त्यांची शहर बसवर दगडफेक

March 16, 2011 3:35 PM0 commentsViews: 2

16 मार्च

मोनिका खून प्रकरणी केडीके इंजीनियरींग कॉलेजच्या प्राचायांर्ना निवेदन देण्यासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यावर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. कॉलेजमध्ये काल निवेदन देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना सुरक्षारक्षकांना गेटवर अडवलं होतं. यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखून धरण्यासाठी सौम्य लाठीमार केला. यानंतर झालेल्या धावपळीत 4 कार्यकर्ते जखमी झाले आहे.

या घटनेनंतर चिडलेल्या भाविसे च्या कार्यकर्त्यांनी सात स्टार बसेसची तोडफोड केली. यशोधरा नगर, पाचपावली आणि वर्धा रोड परिसरात कार्यकर्त्यांनी दगडफेक करत बसेसच्या काचा फोडल्या. नागपूर पोलिसांनी या प्रकरणी तोडफोड करणार्‍या कार्यकर्त्याविरुध्द गुन्हे दाखल केले असून आरोपींचा शोध सुरु केला आहे. तीन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

close