इंग्लंडची टीम मुंबईत दाखल

November 7, 2008 4:11 PM0 commentsViews: 5

07 नोव्हेंबर मुंबई,इंग्लंडचा भारत दौरा 14 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्यासाठी इंग्लंडची टीम मुंबईत दाखल झाली आहे. या दौ-यात भारत आणि इंग्लंड यांच्यात एकूण 7 वन डे आणि 2 टेस्ट मॅच होणार आहे. भारताविरुद्धच्या सात वन डे सिरीजसाठी इंग्लंड टीमचं नेतृत्व सोपवण्यात आलयं ते केविन पीटरसनवर. यावेळच्या भारत दौ-यावर स्पिन बॉलर माँटी पानेसारला टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. त्याच्या जागी समित पटेल या भारतीय वंशाच्या खेळाडूला संधी मिळाली आहे. फास्ट बॉलर टीम ब्रेसनच्या जागेवर फिट झालेल्या रेयान साइडबॉटमचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. त्याचबरोबर ऑलराऊंडर फिन्टॉफच्या समावेशानं इंग्लंडची टीम आणखीच मजबूत झाली आहे. भारतीय वनडे टीम सध्या चांगलीच फॉर्मात आहे. आणि याची पूर्ण कल्पना पीटरसनच्या टीमला आहे. 2006मध्ये इंग्लंडची टीम भारताच्या दौ-यावर आली होती. त्यावेळी खेळलेल्या सहा वन डे सिरीजमध्ये इंग्लंडला तब्बल पाच वन डेमध्ये पराभव पत्करावा लागला होता. आता त्यांचा प्रयत्न असेल तो या पराभवाचा वचपा काढत सिरीज जिंकण्याचा.

close