सर्व पुतळे एकाच ठिकाणी प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध

March 16, 2011 4:16 PM0 commentsViews: 2

16 मार्च

पुणे शहरातील सर्व पुतळे एकाच ठिकाणी ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय पिंपरी-चिचंवड महानगरपालिकेने घेतला आहे. 22 मार्चला होणार्‍या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्या बद्दलचा प्रस्ताव मांडला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे महापौर योगेश बहल यांनी दिली. पिंपरी-चिचंवड शहरात तब्बल 50 पुतळे आहेत.

वाहतुकीच्या आड येणार्‍या आणि ज्यांची निगा राखणं शक्य होत नाहीअसे पुतळे प्राधान्याने हटवले जाणार आहेत. असे सगळे पुतळे पिंपरीतील बर्डव्हॅली समोर असलेल्या 20 एकर जागेत ठेवण्यात येणार आहेत. पुतळ्यांचं हे ठिकाण प्रेक्षणीय होण्यासाठी 5 कोटी रुपये खर्च करुन दिल्लीच्या शक्ती स्थळाच्या धर्तीवर एक बाग उभारली जाणार आहे. मात्र हा निर्णय अंमलात येण्याआधीच या निर्णयाला विरोध असल्याचं विरोधकांनी जाहीर केलं आहे.

close