जैतापूर प्रकल्पाला परवानगी देताना सुनामीचा विचार केला नव्हता- जयराम रमेश

March 16, 2011 5:37 PM0 commentsViews: 3

16 मार्च

जपानमधल्या अणुऊर्जा प्रकल्पातल्या किरणोत्सर्गामुळे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा मुद्दा चर्चेत आला आहे. जैतापूर प्रकल्पाला परवानगी देताना सुनामीचा मुद्दा विचारात घेण्यात आला नव्हता असं केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी स्पष्ट केलं. किरणोत्सर्गाशी संबंधित प्रकरणाची जबाबदारी या अणुभट्टीला अणुपुरवठा करणार्‍या एईआरबी या कंपनीची आहे असं रमेश यांनी स्पष्ट केले. अणुऊर्जेची भारताला गरज आहे पण जपानमधील दुर्घटनेनंतर आता अधिक काळजी घ्यायला हवी असंही रमेश यांनी म्हटलं आहे.

close