कांगारूंची पहिल्या क्रमांकावर झेप

March 16, 2011 5:53 PM0 commentsViews: 6

16 मार्च

वर्ल्ड कपमध्ये बुधवारी झालेल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने कॅनडाचा 7 विकेट राखून पराभव केला. पहिली बॅटिंग करणार्‍या कॅनडाची टीम 211 रन्सवर ऑलआऊट झाली. ब्रेट लीनं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. विजयाचं हे माफक आव्हान ऑस्ट्रेलियाने 3 विकेट गमावत 35 व्या ओव्हरमध्येच पार केले. शेन वॉट्सन आणि ब्रॅड हॅडिननं पहिल्या विकेटसाठी 183 रन्सची पार्टनरशिप केली. पण या दोघांचीही सेंच्युरी मात्र होऊ शकली नाही. वॉट्सन 94 तर हॅडिन 88 रन्सवर आऊट झाले. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियानं ग्रुप ए मध्ये अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे.

close