शिवसेनेच्या खासदारांना विकत घेण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला होता – संजय राऊत

March 17, 2011 9:32 AM0 commentsViews: 1

17 मार्च

काँग्रेसने शिवसेनेच्या खासदारांनाही विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. असा खळबळजनक दावा शिवसेनेनं विकिलिक्सच्या हवाल्याने केला आहे. तसेच याप्रकरणी आम्हाला पब्लिसिटी स्टंट करायचा नव्हता म्हणूनच आम्ही तीन वर्षे कुठलाही गवगवा केला नाही असा दावाही त्यांनी आयबीएन लोकमतकडे केला.

2008 मध्ये सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसने खासदारांना विकत घेतलं असा गौप्यस्फोट विकिलिक्सने केला आहे. अजित सिंह यांच्यासह राष्ट्रीय लोकदलच्या चार खासदारांना काँग्रेसने विकत घेतल्याचा दावा विकिलिक्सने केला. या गौप्यस्फोटानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात जबरदस्त गदारोळ झाला.

close