आदर्श सोसायटीची उंची वाढवण्याचा निर्णय माझाच – फाटक

March 17, 2011 6:24 PM0 commentsViews: 5

17 मार्च

आदर्श सोसायटीच्या उंची वाढवण्याचा निर्णय मी माझ्या अधिकारात घेतला असं पुन्हा एकदा जयराज फाटक यांनी स्पष्ट केलं. आपल्याकडे आदर्शची फाईल आली तेव्हा हायराईजस कमिटीने इमारतीची उंची 103 मीटरने वाढवलेली होती. तो निर्णय हायराईजस कमिटीने समजून उमजून घेतला असल्यामुळे आपण पुन्हा ती फाईल हायराईजस कमिटीकडे पुन्हा पाठवली नाही आणि उंचीला मान्यता दिली असं मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त जयराज फाटक यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. फाटक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केला.

या पुनरूच्चारातून जयराज फाटक यांनी आदर्श इमारतीची उंची वाढविण्याची जबाबदारी एकप्रकारे जयराज फाटक यांनी स्विकारलीच असंच म्हणावं लागेल. मात्र हा निर्णय घेताना कुठल्याही नियमांचे उल्लंघन केलेलं नाही केवळ माझा मुलगा त्या सोसायटीचा सदस्य आहे म्हणून मी निर्णय घेऊ नये काय ? असा सवालही त्यांनी केला. आदर्शची जागा राज्य सरकारची आहे, लष्कराची नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. हा माझ्या विरूध्द कट आहे असं वाटत नाही. सीबीआयला काही गैरसमज झाला असावा त्यामुळे त्यांनी धाडी घातल्या. माझे सगळे व्यवहार चेकनं झालेले आहेत अशी माहितीही जयराज फाटक यांनी दिली. जयराज फाटक यांना सीबीआयने आदर्श सोसायटी प्रकरणात 14 वा आरोपी केलय. दोन दिवसापूर्वी सीबीआयने त्यांच्या मुंबई, दिल्ली यवतमाळ इथल्या घरी छापे टाकले होते. या छाप्या दरम्यान सीबीआयने महत्वाचे कागदपत्र जप्त केले होते.

close