कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात

March 17, 2011 10:53 AM0 commentsViews: 36

17 मार्च

कोकणातल्या खेडोपाडी पारंपरीक शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. बुधवारी संध्याकाळी पोमेंडी गावातली होळी रत्नागिरी शहरातून वाजत गाजत मिरवणुकीने मार्गस्थ झाली. होळी आणताना आजूबाजूच्या गावांच्या पालख्याही या मिरवणुकीत सहभागी झाल्या. गावहोळी उभी राहिल्यानंतर पुढचे पंधरा दिवस जाखडी , नमन , रोंबाट अशा पारंपरिक लोककलांनी हा उत्सव साजरा केला जाणार आहे.

close