वाघाच्या कातडीची ऑनलाईन विक्री करणार्‍या दोघांना अटक

March 17, 2011 11:02 AM0 commentsViews: 1

17 मार्च

वाघाच्या कातडीची ऑनलाईन विक्री करणार्‍या दोघांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत वाघाची कातडी जप्त करण्यात आली आहे. या दोन आरोपींना एअरपोर्ट सेंटर पॉंईट हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आलं. इंटरनेटच्या माध्यमातून वाघाच्या कातडीची ऑनलाईन डिलींग करताना सोनेगाव पोलिसांनी त्यांना जेरबंद केलं. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडले आहे. देवेंद्र राऊत आणि कपिल देवके अशी आरोपींची नावं आहेत.

close