कोल्हापूरमध्ये पुट्टाप्पा पाटील यांचा निषेध

March 17, 2011 11:11 AM0 commentsViews: 1

17 मार्च

कर्नाटकचे साहित्यिक पुट्टाप्पा पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल चुकीची माहिती पसरविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे संतापलेल्या कोल्हापुरातल्या शिवसैनिकांनी आज महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर पुट्टाप्पा पाटील यांचा पुतळा पेटवला. साहित्यिक पुट्टाप्पा पाटील यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल चुकीची माहिती पसरविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सीमावासीय आणि शिवसैनिकांतून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे आज शिवसैनिकांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरच्या कोगनोळी गावाजवळ पुणे-बेंगलोर महामार्गावर पुट्टाप्पा पाटील यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. सगळे शिवसैनिक महामार्गावर आल्याने पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं.

close