हसन अलीचा जामीन रद्द ; 4 दिवसांची कोठडी

March 17, 2011 11:50 AM0 commentsViews: 2

17 मार्च

सुप्रीम कोर्टानं हवालाकिंग आणि घोडे व्यापारी हसन अलीचा जामीन रद्द केला आहे. अलीला अंमलबजावणी संचनालयाच्या ताब्यात देण्यात आले आहे. हसन अलीला चार दिवसाची कोठडी देण्यात आली. सेशन कोर्टानं अलीला जामीन दिला होता. मुंबई सत्र न्यायालयाने अलीला जामीन मंजूर केला होता. या निर्णावर सुप्रीम कोर्टानं आश्चर्य व्यक्त करत अलीच्या वकीलांनी जामीन न मागताही न्यायाधीशांनी जामीन दिला असं कोर्टाने नमूद केले.

close