कोणाचीही मदत घ्यायला हरकत नाही – गडकरी

March 17, 2011 12:03 PM0 commentsViews: 5

17 मार्च

काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कोणाचीही मदत घ्यायला हरकत नाही. आणि त्यासंदर्भात युतीचे नेते एकत्रितपणे निर्णय घेतील. असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. तसेच मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही आणि मला कुठला मंत्रीही व्हायचं नाही असंही यावेळी नितीन गडकरींनी स्पष्ट केले. नितीन गडकरी यांची संपूर्ण मुलाखत तुम्ही बघू शकता आज रात्री 8.30 आणि 11. 30 वाजता फक्त आयबीएन लोकमतवर

close