ओबामांबद्दल मुस्लीम समाज आशावादी

November 7, 2008 2:30 PM0 commentsViews: 10

07 नोव्हेंबर,ओबामांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यामुळे अनेकांच्या अमेरिकेबाबतच्या अपेक्षांमध्ये वाढ झाली आहे.त्यात मुस्लीम समाजसुध्दा मागे नाही. राष्ट्राध्यक्षपदी ओबामांची निवड झाल्यामुळे अमेरिकेबरोबरचे आपले संबंध सुधारावेत असं अनेकांना वाटतं त्यात मुस्लिम समाजही मागे नाही. आफ्रिकन अमेरिकन असलेल्या ओबामांच्या वडिलांचं नाव बराक हुसेन ओबामा असल्यामुळे मुस्लिमांबद्दलच्या अमेरिकेच्या भूमिकेत आता तरी बदल होईल अशी आशा मुस्लीम समाजाला वाटतेय.प्रोफेसर खुर्शिद मोदम्मद यांच्यामते, ओबामांचा विजय हा ऐतिहासिक असून अमेरिकेबरोबरचं इतरही देशांना याचा फायदा होईल. पण हा बदल होण्यासाठी थोडी वाट पहावी लागेल. सगळ्यांच्या भल्यासाठीचं देवाने त्यांची निवड केली असून मुस्लीम समाजाचं ओबामा संरक्षण करतील असं सुध्दा त्यांना वाटतं. मौलवी नूर मोहम्मद यांच्यामते, मुस्लीम समाज आणि अमेरिका यांच्यामध्ये सुसंवाद साधण्यासाठी ओबामांची निवड ही उत्तम संधी असल्याचं जगातल्या मुस्लिमांचं म्हणणं आहे.

close