मनसेचे आमदार जाधव यांना मारहाण प्रकरणी विधानसभा तहकूब

March 17, 2011 12:12 PM0 commentsViews: 2

17 मार्च

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव मारहाण प्रकरणावरुन विधानसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. या मुद्यावरुन विरोधी पक्षांनी जोरदार गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. याप्रकरणी विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्याच्या केबीनमध्ये धाव घेवून या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी आर. आर. पाटील यांच्या निवेदनामुळे विरोधी पक्षाचे जराही समाधान झालेलं नाही त्यामुळे गोंधळ कायम होता. या प्रकरणी दोषी पोलीस अधिकार्‍यांना बडतर्फ करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. मात्र या ऐवजी 5 जेष्ठ सदस्यांची कमिटी नेमून चौकशी करावी आणि त्यानंतर कारवाई करावी असा प्रस्ताव सरकारतर्फे दिला गेला. मात्र विरोधकांनी हा प्रस्ताव मान्य केला नाही.

close