संगीतावर आधारित ‘एनसायक्लोपीडिया’

March 17, 2011 12:49 PM0 commentsViews: 3

राजेंद्र हुंजे, मुंबई

17 मार्च

ऑक्सफोर्ड पब्लिकेशननं भारतीय संगीतावर आधारित एनसायक्लोपीडिया पुस्तक रूपानं बाजारात आणलाय. भारतीय शास्त्रीय संगीत, लोककला, चित्रपट संगीत, रागदारी, नृत्य आणि संगीतातल्या घराण्यांविषयी विस्तृत माहिती यात मांडण्यात आली आहेत. या एनसायक्लोपीडियाचं बुधवारी मुंबईत प्रकाशन करण्यात आलं.

बासरीच्या सुरेल स्वराने चाहुल लावून दिली ती ऑक्सफोर्डच्या एनसायक्लोपीडिया ऑफ द म्युझिक ऑफ इंडियाची. तब्बल 2 हजार वर्षांच्या संगीताचा इतिहास सांगणार्‍या तीन खंडाचं मुंबईत प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आलं.

1961 सालापासून कै. पंडित निखिल घोष यांनी मुंबईच्या संगीत महाभारतीच्या सहयोगानं याचं काम सुरु केलं होतं. वडिलांचे स्वप्न आज ऑक्सफोर्डच्या एनसायक्लोपीडियाच्या माध्यमातून साकार झाल्याची भावना पंडित नयन घोष यांनी व्यक्त केली.

या एनसायक्लोपीडियाच्या रूपाने संगीतातल्या अभ्यासकांसाठी एक नवा खजिना खुला झाल्याचे संगीत समीक्षक अमरेंद्र धनेश्वर सांगतात.तीन खंडात प्रकाशित झालेल्या ऑक्सफोर्डच्या या एनसायक्लोपीडियाची किंमत असणार 9 हजार 950 रूपये. आणि लवकरच ही सगळी माहिती इंटरनेटवर उपलब्ध करून देण्यार असल्याचे ऑक्सफोर्डच्यावतीनं सांगण्यात आले आहे.

close