गॅस एजन्सी ब्लॅकने सिलेंडर विक्री करता ग्राहकांचा आरोप

March 17, 2011 3:02 PM0 commentsViews: 4

17 मार्च

वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरगुती गॅसची टंचाई आहे. रॉकेल मिळत नसल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. गॅस एजन्सी मात्र माथाडी कामगारांच्या संपामुळे सिलेंडरचा तुटवडा झाल्याचे सांगते आहे. नालासोपार्‍यातील तनया गॅस एजन्सीतून भारत गॅसचे वितरण होते. मात्र गेल्या काही दिवसापासून इथ ग्राहकांच्या रांगा लागत आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनकडून अनियमीत आणि अपुरा गॅस पुरवठा होत असल्याची सबब एजन्सीचे कर्मचारी देत आहेत. मात्र रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला गॅस सिलेंडरनी भरलेला ट्रक उभे आहेत. सिलेंडर ग्राहकांपर्यंत सरळ मार्गाने पोहचण्या ऐवजी ब्लॅकने ते विकले जात असल्याचा ग्राहकांचा आरोप आहे.

close