मुंबईचा पारा 40 अंशावर

March 17, 2011 3:32 PM0 commentsViews: 1

17 मार्च

मुंबईसह कोकण किनारपट्टीवर आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे पार्‍यानं 40 अंशांची पातळी गाठली आहे. गुजरात आणि पाकिस्तान भागातील अरबी समुद्राजवळ निर्माण झालेल्या ऍटीसायक्लॉन स्थितीमुळे ही तापमानातली वाढ असल्याचे पुणे वेधशाळेच्या संचालिका मेधा खोले यांनी सांगितले. मुंबईत काल 41.6 अंश तापमानाची नोंद झाली. याआधी 28 मार्च 1956 साली 41.7 अंश तापमानाची नोंद झाली होती. अँटीसायक्लॉनमुळे समुद्रावरून येणारे आर्द्र वारेसुद्दा वाहणं बंद झाले त्यामुळे मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होतेय.

close