युतीच्या नगरसेवकांचे महापालिकेच्या मुख्यद्वारावर ठिय्या आंदोलन

March 17, 2011 3:57 PM0 commentsViews: 2

17 मार्च

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी बळाचा वापर करुन विरोधक नगरसेवकांचा वार्डस्तरीय निधी पळवल्याचे पडसाद आज शहरात उमटले. शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या मुख्यद्वारावर तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनाचं नेतृत्व शिवसेनेचे खासदार शिवाजीराव अढळराव यांनी केलं. पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधार्‍यांनी अजित पवारांच्या आदेशावरुनच हे कृत्य केले अशा प्रकारचे आरोप करत यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर अपंगासाठी राखीव ठेवलेल्या निधीपैकी 3 कोटी रुपये विरोधक नगरसेवकांनी पळवल्याची धक्कादायक माहिती या आंदोलनाच्या दरम्यान अपक्ष नगरसेवक मारोती भापकर यांनी दिली. या आंदोलनाचा धसका घेऊन आज महानगरपालिकेचे आयुक्त आशिष शर्मा आणि महापौर योगेश बहल हे महापालिकेत फिरकलेच नाहीत.

close