पुण्यात अणुप्रकल्पाच्या विरोधात ठिय्या आंदोलन

March 17, 2011 4:02 PM0 commentsViews: 1

17 मार्च

जपानमधील घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतात अणुप्रकल्पांना परवानगी देऊ नये. तसेच जैतापूर प्रकल्प रद्द करावा या मागणीकरता पुण्यात लोकायत संस्थेतर्फे धरणं आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी ठिय्या मांडला. अमेरिका, जर्मनी, फ्रान्स या देशांनीही त्यांचे आगामी अणुप्रकल्प रद्द केले असा दावा आंदोलकांनी केला. भारताने ही या विकसित देशांचा कित्ता गिरवावा अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनात समाजवादी नेते भाई वैद्य, माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील सहभागी झाले होते.

close