भायंदर येथे केमिकल फॅक्टरीला भीषण आग

March 17, 2011 4:04 PM0 commentsViews: 1

17 मार्च

मुंबई जवळच्या भायंदर भागातील केमिकल फॅक्टरीला बुधवारी रात्री भीषण आग लागली. या आगीमध्ये लाखो रूपयांच नुकसान झालं आहे. पण आगीच कारण मात्र कळू शकलं नाही. ही आग विझवण्यासाठी जवळपास 15 फायर इंजिन 8 वॉटर टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आले होते. आग एवढी मोठी होती की ती विझवण्यासाठी ठाणे, भिवंडी आणि डोंबिवलीवरून फायर इंजिन मागवण्यात आले होते. अखेर फायर ब्रिगेडच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात जवानांना यश आलं आहे.

close