जपानमधील लोकांना बळ दे…

March 17, 2011 4:08 PM0 commentsViews: 3

17 मार्च

जपानमध्ये भूकंप आणि प्रलयकारी सुनामीच्या संकटानंतर अणुस्फोटाच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहेत. त्यामुळे जपान हवालदिल झाला आहे. संकटग्रस्त जपानला मानवतेच्या भावनेतून दिलासा देण्यासाठी कोल्हापूरमध्ये दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थांनी वेगळ्याप्रकारे संदेश दिला. ह्या विद्यार्थांनी भवानी मंडपात रंगाच्या माध्यमातून कॅनव्हासवर हाताचे ठसे उमटवले. त्याबरोबर आम्ही तुमच्याबरोबर आहोत असा संदेश दिला. जपानमधील लोकांना आलेल्या संकटाला तोड देण्यासाठी बळ दे अशा प्रकारची प्रार्थना ह्या विद्यार्थांनी केली.

close