युवराज सिंगला व्हाइस कॅप्टन पदावरून डच्चू

November 7, 2008 4:39 PM0 commentsViews: 6

07 नोव्हेंबर भारतीय टेस्ट आणि वनडे टीमचा व्हाइस कॅप्टन युवराज सिंगला पदावरून डच्चू देण्यात आला आहे. भारतीय टेस्ट आणि वनडे टीमचा व्हाइस कॅप्टनची जबाबदारी आता भारताचा धडाकेबाज ओपनर विरेंद्र सेहवागवर सोपवण्यात आली आहे. स्टार क्रिकेटर असणं सोपं नसतं. आणि विशेषतः युवराज सिंगसारख्या क्रिकेटपटूंसाठी तर नाहीच नाही. युवराज एकतर क्रिकेटचा सराव तरी करत असतो किंवा कुठल्यातरी प्रमोशनल इव्हेंटमध्ये बिझी तरी असतो. असं असलं जरी गेल्या काही सामन्यात त्याला आपल्या कामगिरीत चमक दाखता आलेली नाही. गेल्या काही वनडेमध्ये त्याची कामगिरी सातत्यानं खराब झाली आहे. इतकंच काय तर नुकत्याच संपलेल्या चॅलेंजर ट्रॉफीतही तो सपशेल फ्लॉप ठरला.परिणामी युवराज सिंगला टेस्ट आणि वन डे टीमच्या व्हाइस कॅप्टन पदावरुन डच्चू देण्यात आला. या उलट 30 वर्षांच्या विरेंद्र सेहवागची कामगिरी मात्र धडाकेबाज होत आहे. टेस्टबरोबर त्यानं वन डेतही आपली कामगिरी सिद्ध केली आहे. आणि याच जोरावर त्याला आता टेस्ट आणि वन डे टीमचा व्हाइस कॅप्टन बनवण्यात आलयं.

close