नांदेडमध्ये 31 हत्या करणारा सीरियल किलर गजाआड

March 17, 2011 2:48 PM0 commentsViews: 2

17 मार्च

नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, निझामाबाद, अदिलाबाद या जिल्ह्यांमध्ये गेल्या 6 महिन्यात 31 महिलांची गळा आवळून हत्या करण्यात आली. ज्या संशयित सीरियल किलरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने या 31 घटनांपैकी 19 हत्या केल्याची कबुली दिली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या अजीज खान-पठाणची हत्या करण्याची पद्धतही अंगावर शहारे आणणारी आहे. या सीरियल किलरच्या दहशतीने गेल्या 6 महिन्यांपासून या परिसरातील महिला शेतात जायलाही घाबरत होत्या. नागरिकांसह पोलिसांनाही भंडावून सोडलेल्या या नराधमला अटक केल्यानंतर आता सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. चारित्र्याच्या संशयावरुन संशयित अजीज खानचं स्वतःच्या पत्नीशी पटत नव्हतं. या सूड भावनेतूनच तो महिलांची हत्या करत असावा असं आता पोलीस सांगत आहेत. या माथेफिरु आरोपीनं केवळ खूनच केले नाहीत तर अनेक महिलांना वासनेचंही शिकार बनवलं. त्यामुळे आता तरी त्याची दहशत थांबेल अशी आशा नागरिकांना वाटत आहे.

close