जपानला किरणोत्सर्गाचा धोका

March 17, 2011 6:25 PM0 commentsViews: 2

17 मार्च

जपानमध्ये सुनामीनंतर आता किरणोत्सर्गाच्या धोक्याशी लढतंय. फुकूशिमातल्या स्फोट झालेले रिऍक्टर्स थंड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज सकाळी हेलिकॉप्टरमधून पाण्याचा फवारा करण्यात आला. स्फोटामुळे निर्माण झालेली आग पसरु नये, यासाठी 3 नंबरचं रिऍक्टर थंड करणं अतिशय गरजेचं आहे. दरम्यान बचावकार्याची माहिती जपानचे पंतप्रधान नाटो कान यांनी देशवासियांनी दिली. आणि संयम बाळगण्याचे आवाहन केलं. पण परिस्थिती खूपच धोकादायक झाल्याचा दावा युरोपीयन युनियननं केला आहे. अमेरिका, रशिया आणि युरोपीयन देशांनी आपल्या जपानमधल्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केलंय.

close