आ.जाधव मारहाण प्रकरणी दोन पोलीस अधिकार्‍यांचे निलंबन

March 18, 2011 6:01 PM0 commentsViews: 16

18 मार्चआमदार हर्षवर्धन जाधव मारहाण प्रकरणी अखेर पोलीस अधिकार्‍यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले आहे. आर आर पाटील यांनी विधानसभेत पीआय अभिमन्यू पवार आणि पीएसआय सुर्यकांत कोकणे यांच्या निलंबनाचे आदेश दिलेत. पोलीस महासंचालकाकडून पोलिस उपअधिक्षक अरविंद चावरीया आणि पीएसआय घनश्याम पाळवदे यांची नव्यानं चौकशी होणार आहे.

हर्षवर्धन जाधव या प्रकरणी नव्यानं एफआयआर दाखल करु शकतात असंही पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी आज विधानसभा सदस्यांच्या समितीची बैठक पार पडली. बैठकीला आर आर पाटील, हर्षवर्धन पाटील, गणपतराव देशमुख, एकनाथ खडसे, बाळा नांदगावकर आणि सुभाष देसाई उपस्थित होते. दरम्यान शुक्रवारी सकाळी मनसेच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायर्‍यावर आंदोलन केलं होतं.

close