औरंगाबाद महापालिकेत आयुक्तांच्या तोंडाला काळं फासलं

March 18, 2011 6:00 PM0 commentsViews: 4

18 मार्च

रिपब्लिकन डेमॉक्रेटिक फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादचे महानगरपालिका आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या तोंडाला काळं फासलं. औरंगाबाद महापालिकेच्या विधी अधिकारी अपर्णा थेटे-सेडमकर यांनी महापालिका आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांच्याविरूध्द राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. भापकर विनाकारण बसवून ठेवतात. तसेच वाटेल ते प्रश्न विचारतात अशी गंभीर तक्रार अपर्णा थेटे यांनी केली. तर अकार्यक्षमता लपवण्यासाठीच थेटे यांनी चूकीचे आरोप केल्याचे भापकर यांचं म्हणणं आहे. भापकर आज कार्यालयात येत असतानाच रिपब्लिकन डेमॉक्रटिक फ्रंटच्या कार्यकयांर्नी त्यांच्या तोंडाला काळं फासलं. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ महापालिका कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.

close