आण्विक प्रकल्पांचा फेरआढावा घेण्याचे काम सुरु – डॉ.कलाम

March 18, 2011 11:01 AM0 commentsViews: 7

18 मार्च

जपानवर कोसळलेल्या आपत्तीनंतर भारतातील सगळ्या आण्विक प्रकल्पांच्या सुरक्षिततेचा फेरआढावा घेण्याचे काम सुरु असून त्यामध्ये जैतापूरच्या प्रकल्पाचाही समावेश आहे अशी माहिती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी दिली. इतक्या मोठ्या प्रमाणावर होणार्‍या भूकंप आणि सुनामीसारख्या संकटाचा सामना करायला आपण तयार नव्हतो. त्यामुळे हा फेरआढावा घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यामध्ये डिफेन्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पदवीदान समारंभाला आज डॉ. कलाम आणि ज्येष्ठ अणु शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी देखील कलाम यांच्याप्रमाणेच जपानमध्ये आलेल्या सुनामी आणि भूकंपाच्या पार्श्वभूमीवर कितीही मोठा भूकंप आला तरी तग धरु शकेल असा प्रकल्प उभारण्याचा दृष्टीने अभ्यास सुरु केला आहे असं सांगितलं. तसेच सामान्य जनतेच्या याविषयीच्या शंका दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचंही सांगितले.

दरम्यान, अफजलगुरु यांच्या फाशीच्या प्रकरणावरुन सोनिया गांधी आणि तत्कालीन राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्यात मतभेद असल्याचा गौप्यस्फोट विकिलिक्सने केला होता. पण कलाम यांनी आज याचा इन्कार केला.

close