आयबीएन लोकमतची उत्तूंग भरारी

March 18, 2011 11:27 AM0 commentsViews: 6

18 मार्च

दिल्लीत झालेल्या प्रतिष्ठित न्यूज टेलेव्हिजन अवॉर्ड्समध्ये ‘आयबीएन लोकमत’वर पुरस्कारांचा अक्षरशः पाऊस पडला. दहा महत्त्वाचे पुरस्कार पटकावत तुमच्या आवडत्या चॅनलने महाराष्ट्रापाठोपाठ राजधानी दिल्लीतही आपला दबदबा निर्माण केला. आयबीएन नेटवर्कनं तब्बल 36 पुरस्कार पटकावले. त्यात सीएनबीसी टिव्ही 18 ला तीन, सीएनबीसी आवाजला तीन तर आयबीएन 7 ला दोन पुरस्कार मिळाले आहेत.

न्यूज टेलेव्हिजन पुरस्कार मराठी भाषेत सुरू झाल्यावर पहिलाच पुरस्कार पटकावला तो आयबीएन लोकमतने. आणि काही वेळातच संपूर्ण सोहळ्यावर आपला दबदबा निर्माण केला. वृत्तांकन, सादरीकरण, क्रीडा, प्रमोशन, सामाजिक आशय, शोध पत्रकारिता अशा सर्व प्रकारात आयबीएन लोकमतने बाजी मारली.

– रात्री 9 वाजता प्रसारित होणार्‍या प्राईम टाईम बुलेटिनला सर्वोत्तम प्राईम टाईम बातमीपत्र आणि सर्वोत्तम सादरीकरण असे दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळाले- लेह-लडाखवरील ‘आभाळ पेलताना’ या अमृता दुर्वेंनी केलेल्या रिपोर्ताजला सर्वोत्तम डॉक्युमेंटरीचा पुरस्कार मिळाला.- कमलेश देवरुखकर यांच्या ‘गर्जा महाराष्ट्र’ या साप्ताहिक कार्यक्रमाला समाजप्रबोधन पुरस्कार मिळाला आहे.- स्पेशल इफेक्टचा वापर करुन बनवलेली ‘चौफेर भरत’ ही भरत जाधवची अमोल परचुरे यांनी घेतलेली मुलाखत ठरली सर्वोत्तम एंटरटेनमेंट फीचर- जेएनपीटी टोलनाक्यावरची अवैध टोलवसुली जगासमोर आणणार्‍या विनय म्हात्रे यांच्या बातमीला सर्वोत्तम इन्व्हेस्टीगेटीव्ह रिपोर्ट हा पुरस्कार मिळाला आहे.- मनोज जैस्वाल आणि प्रशांत कोरटकर यांनी केलेल्या नागपूरजवळील बिब्बा फोडणार्‍या महिलांची व्यथा मांडणारा ‘काळिमा माणुसकीला’ हा कार्यक्रम सर्वोत्तम इन्व्हेस्टीगेटीव्ह फीचर ठरला- त्याचबरोबर ‘खेळासाठी सारं काही’ या कार्यक्रमात जयश्री ठोके या कराटेपटूच्या व्यथेला वाचा फाडण्यात आली होती. या कार्यक्रमाला सर्वोत्तम स्पोर्टस् फीचरचा ऍवॉर्ड मिळाला आहे – मराठी चॅनेलमधील बेस्ट प्रोमोचा पुरस्कारही आयबीएन लोकमतनेच पटकावला. गणपती उत्सवादरम्यान बनवलेल्या प्रोमोला बेस्ट प्रोमो कॅम्पेनचा अवॉर्ड मिळाला आहेत.

भारतीय टेलेव्हिजन पत्रकारितेत सर्वांत प्रतिष्ठित मानल्या जाणार्‍या एनटी ऍवार्ड्सचं हे चौथं वर्ष आहे. हे पुरस्कार इंडियन टेलेव्हिजन डॉट कॉम या संस्थेद्वारे दिले जातात. यावर्षी सुमारे शंभर तज्ज्ञ परीक्षकांनी मिळून पुरस्कार विजत्यांची निवड केली. यंदा पहिल्यांदाच मराठी भाषेचा समावेश या पुरस्कारात करण्यात आला होता. आणि पहिल्याच वर्षात आयबीएन लोकमतने राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला.

close