गहू घोटाळा प्रकरणातील फरार नगरसेवकाला अटक

March 18, 2011 11:56 AM0 commentsViews: 3

18 मार्च

गहू घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी आणि काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद सुर्यवंशी यांना अटक करण्यात आली आहे. सांगलीतील बाबर मळ्यात छापा टाकून ही कारवाई करण्यात आलीय. सांगलीत गेल्या दोन महिन्यात बेकायदेशीर गव्हाचा साठा केलेल्या गोडावूनवर पोलिसांनी छापे घातले होते. यादरम्यान पोलिसांनी 400 पोती गहू जप्त केला होता. या दोन्ही प्रकरणी प्रमोद सुर्यवंशी याचं नाव पुढे आलं होतं. अप्पर पोलीस अधिक्षक बाळासाहेब वाघमोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. सुर्यवंशीसह 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

close